मुंबई- बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता राजकुमार राव याचे वडिल सत्यपाल यादव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
राजकुमारचे वडिल सत्यपाल यादव यांचं निधन, ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - अंत्यसंस्कार
सत्यपाल यांना गेल्या १७ दिवसांपासून या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. आज सकाळी १० वाजता मदन पुरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
राजकुमारचे वडिल सत्यपाल यादव यांचं निधन
सत्यपाल यांना गेल्या १७ दिवसांपासून या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. आज सकाळी १० वाजता मदन पुरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी हजेरी लावली होती.
सत्यपाल हे महसूल विभागात सरकारी कर्मचारी होते. राजकुमारची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची होती. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, की घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने दोन वर्ष माझ्या शिक्षकांनीच माझी शैक्षणिक फी भरली होती.