महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वाढदिवस विशेष : मध्येच कोर्स बदलला आणि 'हिराणी' नावाचा दिग्दर्शक देशाला मिळाला - Rajkumar Hirani Birthaday

बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचा आज ५७ वा वाढदिवस साजरा होत आहे. प्रत्येक चित्रपट हिट होण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी आजवर पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम केले आहेत. त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाची परिभाषाच बदलली आहे.

वाढदिवस विशेष

By

Published : Nov 20, 2019, 1:20 PM IST


राजकुमार हिराणीचे वडील सिंध प्रांतातून म्हणजे आजच्या पाकिस्तानातून भारतात आले. त्यांचा टायपींग स्कूलचा व्यवसाय होता. मात्र, आपण काहीतरी वेगळे करायचे ठरवलेल्या राजकुमार यांनी वडिलांचा व्यवसाय न निवडता नाटकाकडे लक्ष केंद्रीत केले.

राजकुमार यांनी पुण्याच्या टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये हिरो होण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र, शिकताना त्यांचा इरादा बदलला. त्यांनी कोर्स बदलला आणि दिग्दर्शनात प्रवेश घेतला. १९९३ मध्ये त्यांनी आपला मोर्चा सिनेमाकडे वळवला. जाहिरातीच्या क्षेत्रातही स्वतःला आजमावले. १९९४ मध्ये त्यांनी '1942 ए लव स्टोरी', आणि १९९८ मध्ये 'करीब' या सिनेमांचे प्रोमो त्यांनी बनवले. त्यानंतर २००० मध्ये 'मिशन कश्मीर' आणि २०००१ मध्ये 'तेरे लिए' या सिनेमांचे एडिटींग त्यांनी केले. परंतु, सिनेमाचा खरा प्रवास २००३ नंतर सुरू झाला.

त्यांनी स्वतःच्या दिग्दर्शनाखाली बनवलेला पहिला चित्रपट होता 'मुन्नाभाई एमबीबीएस'. संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. राजकुमार हिराणी हे नाव या सिनेमामुळे घराघरात पोहोचले. त्यानंतर २००६ मध्ये या चित्रपटाचा पुढील भाग 'लगे रहो मुन्नाभाई' बनवला. त्यालाही उत्तुंग यश मिळाले.

चित्रपट दिग्दर्शनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या हिराणी यांनी २००९ मध्ये 'थ्री इडियट्स' बनवला. या चित्रपटाने अक्षरशः इतिहास रचला. हिराणी पुढील चित्रपट कोणता बनवणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले. परंतु, घाईघाईत सिनेमा बनवणाऱ्यांपैकी हिराणी नाहीत. त्यांनी तब्बल पाच वर्षे वेळ घेतला आणि संपूर्ण देशाला वेड लावणारा सुपरहिट 'पीके' बनवला.

गेल्या वर्षी संजय दत्तचा बायोपिक 'संजू' घेऊन राजकुमार हिराणी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आले. अर्थात या चित्रपटालाही अपेक्षित यश मिळाले. आता त्यांच्या पुढच्या सिनेमाची प्रतिक्षा संपूर्ण देश करीत आहे. आजवर ११ फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेल्या राजकुमार हिराणींना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या ईटीव्ही भारतच्या शुभेच्छा.

ABOUT THE AUTHOR

...view details