हैदराबाद- दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऐश्वर्या साउथमधील एक दिग्दर्शिका आणि गायिका आहे. ऐश्वर्या हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शिका म्हणून हात आजमावणार आहे. चित्रपटाचे शीर्षकही निश्चित झाले आहे. निर्माती मीनू अरोरासोबत ऐश्वर्या तिचा पहिला बॉलिवूड प्रोजेक्ट सुरू करणार आहे. हा एक प्रेमकथा असलेला चित्रपट असेल, जो सत्यकथेवर आधारित आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्या 'ओ साथी चल' नावाचा हिंदी चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. निर्मात्या मीना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाची स्टारकास्ट अजून निवडायची आहे. ऐश्वर्याबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच तिच्या मुसाफिर या गाण्याने चर्चेत आली होती. याआधीही ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
ऐश्वर्याचा घटस्फोट झाला आहे