हैदराबाद - सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'अण्णात्थे' चित्रपटाचे शुटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. शुटिंग टीममधील क्रू मेंबर्सची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सुरक्षततेच्या कारणास्तव शुटिंग थांबवण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे.
"घोषणा: 'अण्णात्थे' शूटच्या रूटीन टेस्टिंग दरम्यान ४ क्रू मेंबर्सनी कोविड १९ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि इतर क्रू मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आली आहे. अण्णात्थे शुटिंग पुढे ढकलण्यात आले आहे,'' असे ट्विट सन पिक्चर्सने केले आहे.
१४ डिसेंबर रोजी सन पिक्चर्सने एक फोटो पोस्ट केला होता ज्यामध्ये रजनीकांत यांच्या 'अण्णात्थे' शुटिंगच्या वेळचा हा फोटो असल्याचे लिहिले होते. या फोटोत रजनीकांत मास्क लावून खुर्चीवर बसलेला दिसत होता.