महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'इन टू द वाईल्ड' मध्ये रजनीकांत यांच्या स्टंट्सचा धमाका, ठरला सर्वाधिक रेटेड टीव्ही शो - Rajinikanth latest news

डिस्कवरी वहिनीच्या सर्व चॅनल्सवर या शोचा प्रीमिअर प्रसारित झाला होता. या शोच्या रेटिंग मध्ये आता आणखी चार पटीने वाढ झाली आहे.

Rajinikanth into the wild show highest rated in TV show
'इन टू द वाईल्ड' मध्ये रजनीकांत यांच्या स्टंट्सचा धमाका, ठरला सर्वाधिक रेटेड टीव्ही शो

By

Published : Apr 3, 2020, 11:09 AM IST

मुंबई -दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना बेयर ग्रिल्स सोबत इन टू द वाईल्ड या टीव्ही शो मध्ये पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून आतुर होते. या कार्यक्रमाचा प्रीमिअर प्रसारित झाल्यानंतर टीव्ही वरील हा सर्वाधिक रेटेड शो ठरला होता.

डिस्कवरी वहिनीच्या सर्व चॅनल्स वर या शो चा प्रीमिअर प्रसारित झाला होता. या शोच्या रेटिंग मध्ये आता आणखी चार पटीने वाढ झाली आहे.

सोशल मीडयावर देखील या कार्यक्रमाची बरीच चर्चा झाली. जानेवारी महिन्यात कर्नाटकच्या बंदिपुर येथील जंगलात रजनीकांत यांनी या कार्यक्रमाचे शूटिंग पूर्ण केले.

मार्च महिन्यात या कार्यक्रमाचा प्रीमिअर प्रदर्शित झाला. 12.4 मिलियन प्रेक्षकांपर्यंत या कार्यक्रमाचा रिच पोहचला. यामध्ये आता आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे टीव्ही शो मध्ये या कार्यक्रमाने अव्वल स्थान मिळवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details