अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा याला 19 जुलै 2021 रोजी रात्री अटक करण्यात आली. त्याच्यावर अश्लिल चित्रपट बनवण्याचा आणि काही अॅप्सवर अपलोड करण्याचा आरोप आहे. राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या होत्या. त्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्याने म्हटले होते, ''रस्त्यातील अडथळा तात्पुरता आहे! कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही!''
राज कुंद्राने वरील पोस्ट लिहिल्यानंतर त्यासोबत काही हॅशटॅग वापरले होते. त्यात मंडे मोटीव्हेशन, राजमंत्र, कोट, ग्रॅटीट्यूड अशा शब्दांचा वापर केला होता. त्यासोबतच त्याने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला होता.