मुंबई - पॉर्न रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १४६७ पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केल्याच्या एक दिवसानंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याने मुंबई सत्र न्यायालयातून त्याचा जामीन अर्ज मागे घेतला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानं आता त्याच आधारावर कुंद्रा जामीनासाठी दावा दाखल करणार आहे.
जामीन अर्ज मागे घेतला -
फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवोदित कलाकारांना अर्धनग्न, नग्न चित्रे आणि व्हिडीओ काढण्याचे आमिष दाखवले गेले होते, जे नंतर अपलोड केले गेले. कुंद्रा अंधेरी येथील विआन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातून हॉटशॉट्स अॅप चालवत असे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब्रेक देण्याचे बहाण्याने अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या राज कुंद्रा व रायन थॉर्प यांची नावे गुन्हे शाखेने चार्जशीटमध्ये नोंदवली आहेत. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांना मुंबई गुन्हे शाखेने १ जुलै रोजी अटक केली होती आणि ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची जामीन याचिका मुंबई सत्र न्यायालयापुढे प्रलंबित होती. आज त्यावर सुनावणी होणार होती, मात्र कालचा मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पुरवणी चार्जशीट दाखल केले आहे. त्यात राज कुंद्रा याचे नाव असल्याने त्याने आता याच न्यायालयात जामीन मिळावा यासाठी मुंबई सत्र न्यायालयातून आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे.
ब्रेक देण्याचे बहाण्याने अश्लिल चित्रफिती -