मुंबई- उद्योगपती राज कुंद्रा दोन महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात ६० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राज कुंद्राला सोमवारी ५० हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मिळाला. मुंबई सत्र न्यायालयाने कुंद्रा आणि त्याचे सहआरोपी रायन थोरपे यांना जामीन मंजूर केला आहे.
गुन्हा चुकीच्या आधारावर असल्याचा कुंद्राचा दावा
मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला जुलैमध्ये अटक केली होती. पोलिसांनी नुकतीच या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर कुंद्राने नव्याने दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला पन्नास हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा चुकीच्या आधारांवर असून केवळ शॉर्ट फिल्म्स तयार केल्या किंवा अपलोड केल्याचा पुरावा पोलिसांकडे नाही आणि आरोपपत्रात त्याचा उल्लेख नाही, असा दावा केला आहे. हॉटशॉट आणि बॉलीफेम अॅपमार्फत अश्लील कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप पोलिसांनी कुंद्रावर ठेवला आहे. न्यायालयाने कुंद्राचा सहकारी रायन थॉर्पलाही जामीन मंजूर केला आहे.
जामीनासाठी सुरू होती धडपड
१४६७ पानांचे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सहा दिवसांनी १५ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला मुख्य आरोपी म्हणून नामांकित केले. त्यानंतर लगेचच, कुंद्रा आणि थोरपे यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आणि सांगितले की आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, जे पोलिस तपास संपल्याचे दर्शवते.
सहआरोपींना मिळाला होता जामीन