मुंबई - राहुल गांधींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान पाहिला जातोय. राहुल यांचा हा व्हिडिओ बुधवारी दिल्लीतला आहे. ख्यातनाम फोटोग्राफर विराल भयानी यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बुधवारी दिल्लीतील पीव्हीआर सिनेमा हॉलमध्ये पोहोचले. इथे त्यांनी सध्या चर्चेत असलेला 'आर्टिकल 15' हा सिनेमा पाहिला. राहुल यांना सिनेमागृहात पाहून प्रेक्षक चकित झाले असल्यास नवल नाही.
Video: अध्यक्षपद सोडलेले राहुल गांधी दिसले चित्रपटगृहात, पाहिला 'हा' सिनेमा - PVR Delhi
अलिकडेच काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले राहुल गांधी दिल्लीच्या पीव्हीआर सिनेमा हॉलमध्ये दिसले. त्यांना थिएटरमध्ये पाहून प्रेक्षक चकित झाले नसतील तरच नवल. अनुभव सिन्हा यांच्या आर्टिकल १५ या चित्रपाटचा रसस्वाद राहुल यांनी घेतला.
राहुल गांधी यांनी अलिकडेच काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आज मुंबईत ते न्यायालयाच्या कामासाठी आले होते. 'आर्टिकल 15' हा सिनेमा सामाजिक स्तरावर भरपूर चर्चेत आहे. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट बराच गाजतोय. यात आयुष्यमान खुराणाची प्रमुख भूमिका आहे.
आयुष्यमान यांच्याशिवाय या चित्रपटात अलावा ईशा तलवार, एम नसर, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अय्यूब यांच्या भूमिका आहेत. या सर्वांच्या जबरदस्त परफॉर्मन्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.