मुंबई- अभिनेत्री राधिका मदन तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे नेहमी प्रभावित करीत असते. एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून तिला आपली छाप सोडायची आहे. यावर्षीच्या सुरूवातीला तिने 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट गाजवला होता. त्याअगोदर २०१८ मध्ये तिने 'पटाखा' चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
राधिकाने तिच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि भविष्यात ती साकारत असलेल्या भूमिकांविषयीचा खुलासा केलाय.
"यापूर्वी मी न केलेल्या भूमिका मला करायच्या आहेत. मला पुन्हा-पुन्हा तेच पात्र साकारणे आवडत नाही. एखाद्या कलाकाराने वेगवेगळ्या भूमिका साकारणे खूप आव्हानात्मक आहे," असे ती म्हणाली.
हेही वाचा - ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी यांचे निधन