मुंबई - निरनिराळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणारे राधिका आपटे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या वेगळेपणामुळे सतत चर्चेत असतात. अशात आता ही बिनधास्त जोडी लवकरच ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहे. रात अकेली हैं असं शीर्षक असलेल्या चित्रपटात हे दोघेही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
'रात अकेली हैं'मध्ये नवाजसोबत स्क्रीन शेअर करण्याच्या अनुभवाबद्दल राधिका म्हणते... - क्राईम थ्रिलर
नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने नवाजसोबत काम करतानाचा आपला अनुभव सांगितला आहे. तो एक असा अभिनेता आहे, जो आपल्या कामाप्रती पूर्ण प्रामाणिक आहे. त्याच्याकडूम मी भरपूर नव्या गोष्टी शिकत असल्याचे राधिका म्हणाली.
नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने नवाजसोबत काम करतानाचा आपला अनुभव सांगितला आहे. नवाज एक उत्तम अभिनेता आहे आणि मला नेहमीच त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. तो एक असा अभिनेता आहे, जो आपल्या कामाप्रती पूर्ण प्रामाणिक आहे. त्याच्याकडूम मी भरपूर नव्या गोष्टी शिकत असल्याचे राधिका म्हणाली.
नवाज आणि राधिकाने याआधी 'सेक्रेड गेम्स'मध्येही एकत्र काम केलं आहे. दरम्यान हनी त्रेहन यांचं दिग्दर्शन असलेला 'रात अकेली हैं' हा चित्रपट क्राईम थ्रिलर असणार आहे. चित्रपटात श्वेता त्रिपाठीही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाबद्दलची इतर माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.