मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राधिका आपटेचा आज वाढदिवस आहे. मराठमोळी ही बॉलिवूड अभिनेत्री ३४ वर्षांची झालीय. अनेक संघर्षातून तिने आपले स्थान पक्के केले आहे. २००५ मध्ये शाहीद कपूरच्या 'वाह लाईफ' चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र, तिला ओळख मिळाली २०११ मध्ये आलेल्या 'शोर इन द सिटी' चित्रपटामुळे. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 'अंधाधून', 'लस्ट स्टोरी', 'पॅडमॅन', 'फोबिया', 'मांझी', 'बदलापूर' आणि 'पार्चड्' यासारखे चित्रपट तिच्या नावावर आहेत.
राधिका आपटे वाढदिवस : 'हिरो'च्या कानाखाली मारुन तिने दाखवला होता हिसका - कास्टिंग काऊचचाही ती बळी ठरली
अभिनेत्री राधिका आपटे ३४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. अनेक संघर्षातून तिने आपले स्थान पक्के केले आहे. २००५ मध्ये शाहीद कपूरच्या 'वाह लाईफ' चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात तिला खूप वाईट अनुभवातून जावे लागले. अनेकवेळा कास्टिंग काऊचचाही ती बळी ठरली होती. एका मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती, ''एकदा मला फोन आला आणि निर्माता म्हणाला तू हिरोसोबत मिटींग कर. त्याच्यासोबत तुला रहावं लागेल.'' त्यानंतर तिने नेहा धुपियाच्या शोमध्ये काही गोष्टींचा खुलासा केला होता. चित्रपटाच्या ऑडिशनच्यावेळी तिला अश्लील बोलावे लागले होते. त्यानंतर मात्र तिने असे केले नाही. राधिकाने आणखी एका गोष्टीचा खुलासा करताना म्हटले की, ''माझा पहिला दिवस होता. दक्षिणेतल्या एका प्रसिध्द अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुल्या करायला सुरुवात केली. त्याच्या या कृतीमुळे मी वैतागले, कारण यापूर्वी मी त्याला कधीच भेटले नव्हते. मी लगेच त्याला थप्पड मारली.''
हेही वाचा -नेहा जोशी व पुष्कराज चिरपुटकर ‘मीडियम स्पाइसी’मध्ये दिसणार
राधिकाने अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. 'पार्चड्' आणि 'द वेडिंग गेस्ट' या चित्रपटातील तिचे बोल्ड सीन्स खूपच चर्चेचा विषय ठरले होते. राधिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे खूप मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. अनुराग कश्यपच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये तिने काम केले होते. यातील एक बोल्ड सीन लीक झाला होता. याचा भरपूर मनस्ताप तिला सहन करावा लागला. राधिकाचे लग्न बेनिडिक्ट टेलर यांच्यासोबत २०१२ मध्ये झाले आहे. तिचा पती लंडनमध्ये राहत असतो.