मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने आपल्या आगामी ‘राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टायटल ट्रॅक प्रदर्शित केला आहे. हे गाणे सलमान खानसाठी परफेक्ट ब्रँड असल्याचे त्याच्या चाहत्यांनी म्हटले आहे. सिटी मार आणि दे दे प्यार दे नंतर राधे या चित्रपटातील तिसरे गाणे सलमान खानने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
राधेचा टायटल ट्रॅक संगीतकार साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केला आहे. या गाण्याचे गीतकार तसेच गायक म्हणूनही साजिद वाजिद यांनीच योगदान दिले होते. मागील वर्षी जूनमध्ये संगीत साथीदार आणि भाऊ वाजिद खान यांच्या निधनानंतर हे गाणे संगीतकार म्हणून साजिद यांनी सलमानबरोबर एकट्याने केलेले हे पहिले गाणे आहे.
राधे चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाल्याने सलमानचे चाहते आनंदात आहेत. झी म्युझिक कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर काहींनी अगदी भाष्य केले की हे गाणे सलमान खानसाठी परफेक्ट ब्रँड आहे. अनेक चाहत्यांना यावेळी वाजिद यांची आठवण झाली. कारण सलमानच्या पार्टनर, दबंग, एक था टायगर आणि बर्याच चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक चार्टबस्टर गाणी दिली आहेत.
सलमान खान आपला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या ईदच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट १३ मे रोजी ४० हून अधिक देशामध्ये रिलीज होणार आहे. झी 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि सर्व आघाडीच्या डीटीएच ऑपरेटर झेडईच्या पे-व्ह्यू-सर्व्हिस झेडईप्लेक्ससह हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध असेल.
हेही वाचा - ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सीझन-२ साठी डिजिटल ऑडिशन्स सुरू