महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रभासने 40 हजार 'डार्लिंग्स'च्या साक्षीने रिलीज केला 'राधे श्याम'चा ट्रेलर - डार्लिंग

प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'राधे श्याम'चा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. हैदराबादमध्ये एका शानदार कार्यक्रमात प्रभासने त्याच्या 40 हजार 'डार्लिंग्स'च्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. 3 मिनिटांच्या ट्रेलरने चित्रपट पाहण्यासाठीची उत्कंठा वाढवली आहे.

'राधे श्याम'चा ट्रेलर
'राधे श्याम'चा ट्रेलर

By

Published : Dec 24, 2021, 3:05 PM IST

हैदराबाद - प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'राधे श्याम'चा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. हैदराबादमध्ये एका शानदार कार्यक्रमात प्रभासने त्याच्या 40 हजार 'डार्लिंग्स'च्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. प्रभास त्याच्या चाहत्यांना 'डार्लिंग' म्हणतो. चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त आणि सुंदर दोन्ही आहे. प्रभासने ट्रेलरमध्ये दाखवले आहे की थिएटरमध्ये तिकीट मिळव्यासाठी चाहत्यांना कष्ट करावे लागणार आहेत.

ट्रेलरमध्ये सर्वात छान आहे तो लोकेशन भाग आहे, प्रत्येक दृश्यात सौंदर्य दिसते. प्रभास आणि पूजा हेगडे यांची जोडीही खूपच सुंदर दिसत आहे. पूजाचे सौंदर्य पाहायला हा ट्रेलर भाग पाडत आहे.

3 मिनिटांच्या ट्रेलरने अडीच ते तीन तासांचा चित्रपट पाहण्यासाठीची उत्कंठा वाढवली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेलर पाहिल्यानंतरही चित्रपटाची कथेचा खुलासा होत नाही. सहसा चित्रपटांच्या ट्रेलरवरून संपूर्ण चित्रपटाचा अंदाज येतो, पण 'राधे-श्याम' याला अपवाद असल्याचे दिसते.

हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो हिंदी व्यतिरिक्त तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद हे प्रसिद्ध टी-सीरीज कंपनीचे मालक आहेत.

हेही वाचा -अमेरिकन अभिनेत्री समंथा लॉकवुडसोबत स्क्रिन शेअर करणार हृतिक रोशन

ABOUT THE AUTHOR

...view details