महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'रँचो'नंतर 'व्हायरस'ने 'फरहानला'ही गाठले, आर माधवन 'थ्री इडियट्स'चा संदर्भ देत खुलासा - आर. माधवनला कोरोना व्हायरसची बाधा

आर. माधवनला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. कालच व्हायरसने आमिर खानला गाठले होते. थ्री इडियट्सचा संदर्भ देत माधवनने मजेशीर पोस्ट लिहून आपल्याला कोरोना झाल्याचे चाहत्यांना कळवले आहे.

R Madhavan latest post
आर माधवन 'थ्री इडियट्स'चा संदर्भ देत खुलासा

By

Published : Mar 25, 2021, 7:28 PM IST

मुंबई- अभिनेता आर माधवनची कोविड -१९ चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांना देताना त्याने त्याच्या गाजलेल्या 'थ्री इडियट' चित्रपटाचा मजेशीर संदर्भ दिला आहे.

'थ्री इडियट' चित्रपटाचा संदर्भ देत माधवनने लिहिलंय, ''फरहानने रँचोला फॉलो केले आणि वायरस नेहमी आमच्या मागे लागला, परंतु यावेळी त्याने अखेर आम्हाला गाठले. पण ऑल इज वेल, कोविड लवकरच बरा होईल. ही अशी जागा आहे तिथे आम्हाला राजू नको आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आभार. मी चांगल्या प्रकारे बरा होत आहे.''

आर माधवन 'थ्री इडियट्स'चा संदर्भ देत खुलासा

आपल्याला माहिती असेल की 'थ्री इडियट' चित्रपटात आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांनी तीन वेड्या मित्रांची भूमिका केली होती. यात आमिर 'रँचो' बनला होता, माधवन 'फरहान'च्या भूमिकेत होता आणि शर्मनने 'राजू रस्तोगी' हे पात्र साकारले होते. बोमन इराणी 'विरु सहस्त्रबुध्दे'ची भूमिका करीत होता पण त्याला सर्वजण 'वायरस' या नावानेच बोलवत असत. नेमक्या याचा संदर्भ देऊन आर. माधवनने ही पोस्ट लिहिली आहे.

कालच आमिर खानला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर वायरसने आज आर. माधवनला गाठले. शर्मनने सावध रहावे असा इशाराच माधवनने दिलाय.

आर माधवनने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने म्हटले होते की आपण शेकडो उपाययोजना करीत भोपाळमध्ये 'अमरिकी पंडित' चित्रपटाचे शुटिंग करीत आहे. तरीदेखील त्याला कोरोना व्हायरसने गाठले आहे.

बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या कलाकारांना यापूर्वीही या प्राणघातक कोरोना विषाणूची बाधा झाली होती. यामध्ये रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, कृती सेनॉन, तारा सुतारिया, सिद्धांत चतुर्वेदी या कालाकारांचा समावेश आहे.

हेही वाचा - कार्तिक आर्यननंतर आता सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची बाधा

ABOUT THE AUTHOR

...view details