मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या दिवसांत प्रवासी कामगारांना मदत करण्यासाठी आपले तन, मन, धन आर्पित करून काम करीत आहे. याचे सर्व स्तरावर कौतुक होत असताना दिसते. यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही सोनूचे खूप कौतुक केले आहे. त्याला उत्तर म्हणून सोनूनेही त्यांना एक वचन दिले आहे.
सीएम अमरिंदर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ''माझे पंजाबी सहकारी संकटाच्या या काळात लोकांची भरभरून मदत करीत आहेत याचा अभिमान वाटतो आणि सध्याच्या काळात आमच्या मोगाचा मुलगा सोनू सूद तत्परतेने, प्रवासी कामगारांसाठी अन्न व वाहतुकीच्या व्यवस्थेत गुंतला आहे. खूप छान सोनू! ”. सोनूनेही याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ''तुमच्या दयाळू शब्दांबद्दल धन्यवाद सर. तुम्ही माझे प्रेरणास्रोत आहात. मी वचन देतो की मी माझ्या पंजाबी सहकाऱ्यांबद्दलचा अभिमान कायम राखेन.''