महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अतरंगी रे' रिलीजपूर्वी सारा अली खानचे सत्यात उतरले स्वप्न - Sara Ali Khans Surprise

सारा अली खानने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या आगामी अतरंगी रे या चित्रपटातील आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील वर्ल्ड फेमस टाइम्स स्क्वेअर बिल्डिंगवर हे चित्र लावण्यात आले आहे.

सारा अली खान
सारा अली खान

By

Published : Dec 18, 2021, 7:10 PM IST

मुंबई- सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'अतरंगी रे' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला रिलीज होत आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अभिनेत्री सारा अली खानचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. 'अतरंगी रे' चित्रपटाच्या पोस्टरला अमेरिकेच्या टाइम स्क्वेअर बिल्डिंगवर स्थान मिळाले आहे.

सारा अली खानने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या आगामी अतरंगी रे या चित्रपटातील आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील वर्ल्ड फेमस टाइम्स स्क्वेअर बिल्डिंगवर हे चित्र लावण्यात आले आहे. सारासाठी हे एका मोठ्या सरप्राईजपेक्षा कमी नाही. साराने हा फोटो शेअर करत लिहिले की, 'हे माझे स्वप्न होते आणि ते येथे पूर्ण झाले.

सारा अली खानचे सत्यात उतरले स्वप्न

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांच्या भूमिका असलेला 'अतरंगी रे' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट यापूर्वी व्हॅलेंटाईन (2022) च्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचे ठरले होते, परंतु कोरोना विषाणूची स्थिती पाहता दिग्दर्शक आनंद एल राय यांनी तो फक्त ख्रिसमसला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.

चित्रपटाचा ट्रेलर आणि 'चका चक' गाणे खूप हिट होत आहे. सारा अली खानवर चित्रीत झालेले 'चका चक' हे गाणे यूट्यूब आणि सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. त्याचवेळी सारा अली खान चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान 'चका चक' गाण्यावर डान्स करताना पुन्हा पुन्हा पाहायला मिळत आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही डान्स व्हिडिओही शेअर केले आहेत.

हेही वाचा -Trailer Of 83 On Burj Khalifa : बुर्ज खलिफावर '83'चा ट्रेलर पाहून रणवीर दीपिकाचे डोळे पाणवले

ABOUT THE AUTHOR

...view details