मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र, निवडणुकांच्या काळात चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल, असे म्हणत निवडणूक आयोगाने या चित्रपटाला स्थगिती दिली होती. आता चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झाली असून यावर चित्रपट निर्मात्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
'पीएम मोदी' बायोपिकला मिळालेल्या नव्या रिलीज डेटवर निर्माते म्हणतात,... - release date
या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. ओमंग कुमार यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात मोदींचा बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला जाणार आहे.
आता हा चित्रपट निवडणूकांच्या निकालानंतर दुसऱयाच दिवशी म्हणजेच २४ मे ला प्रदर्शित होणार आहे. यावर चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित म्हणाले, इतक्या अडथळ्यांनतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. २४ मे ला कोणत्याही अडथळ्यांशिवाय हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी आशा व्यक्त करत हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. ओमंग कुमार यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात मोदींचा बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला जाणार आहे. त्यामुळे, निश्चितच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.