महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियंकाने निक जोनाससोबत घटस्फोटोच्या अफवांचे केले खंडन - इंस्टाग्रामवर लोकप्रिय जोनास कोण ?

प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra Jonas) नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा पती निक जोनासची (Nick Jonas) मस्करी करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रियंका चोप्रा
प्रियंका चोप्रा

By

Published : Nov 24, 2021, 3:57 PM IST

मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने (Priyanka Chopra Jonas)नेटफ्लिक्स कॉमेडी (Netflix comedy show) स्पेशल "जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट" (Jonas Brothers Family Roast) मधील एक क्लिप शेअर केली. यात तिने पॉप स्टार पती निक जोनाससोबत (Pop star Nick Jonas) घटस्फोटाच्या अफवा (Divorce rumors)पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

प्रियांकाने सोमवारी तिच्या सोशल मीडिया हँडलवरून तिच्या नावामधून पतीचे आडनाव काढून टाकले. प्रियांकाच्या या निर्णयामुळे ती अमेरिकन गायक-गीतकार निक जोनासपासून फारकत घेणार असल्याची अटकळ पसरली आहे. प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनाससोबत लग्न केले होते.

प्रियांकाने (Priyanka) मंगळवारी संध्याकाळी उशिरा इंस्टाग्रामवर शोची एक क्लिप शेअर केली. ज्यामध्ये ती निकसोबत (Nick Jonas) दिसली. प्रियांकाने लिहिले की, ''माझे पती आणि त्याच्या भावाने रात्रीच्या जेवणासाठी चांगले रोस्ट आणले. जोनास असण्याचा हाच फायदा आहे. त्यात तिने इमोजीही टाकले आहेत. व्हिडिओ क्लिपमध्ये प्रियांका तिच्याहून 10 वर्षांनी वयाने लहान असलेल्या पतीची खिल्ली उडवताना दिसत आहे."

प्रियांकाने सांगितले की, ते दोघे एकमेकांना खूप काही शिकवतात. ती म्हणाली की, निकने तिला टिकटॉक सोशल नेटवर्किंग कसे वापरायचे हे शिकवले. प्रियांका मस्करीत म्हणाली की, 'मी त्याला शिकवले की यशस्वी अभिनयाची कारकीर्द कशी असते.'

प्रियांकाने गंमतीने सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सर्वात प्रसिद्ध जोनास आहे. तिने लिहिले, "जोनास बंधू ऑनलाइन किती मजकूर पोस्ट करतात ते तुम्ही पाहिले आहे का? तो नेहमी त्याच्या फोनवर, इंस्टाग्रामवर असतो. खूप गोड आहे. असे असूनही, प्रत्येकाच्या फॉलोअर्सची एकत्रित संख्या माझ्या फॉलोअर्सपेक्षा कमी आहे. त्याचे माझ्यापेक्षा कमी फॉलोअर्स आहेत, मी त्याच्या इंस्टाग्रामवर सर्वात लोकप्रिय जोनास आहे. अशा प्रकारे प्रियांका चोप्रा ही इंस्टाग्रामवर सर्वात लोकप्रिय जोनास आहे."

हेही वाचा - अभिनेता शिव ठाकरे कार अपघातातून सुखरुप बचावला

ABOUT THE AUTHOR

...view details