मुंबई -सत्तरीतील इटालियन सिरीज ‘संडोकन’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कबीर बेदी ने ‘ऑकटोप्सी’ या जेम्स बॉण्ड च्या चित्रपटात खलनायकी भूमिकेतून आपली छाप सोडली होती. देखणे व्यक्तिमत्व आणि सेक्सी बॉडी, जे कॉम्बिनेशन त्याकाळी क्वचितच आढळत असे, याच्या जोरावर कबीर बेदीचे पडद्यावरील आणि खाजगी जीवनही नेहमी चर्चेत असे. त्याने आत्मचरित्र, 'स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर', लिहिले असून एकंदरीत ते स्फोटक असण्याची शक्यता अधिक आहे. आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटी प्रियंका चोप्रा जोनास कबीर बेदी यांच्या आत्मचारित्राचे अनावरण करणार आहे.
कबीर बेदी यांच्या आत्मचारित्राचे अनावरण “स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर" कबीर बेदी यांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनातील उतार चढ़ावांबाबत, विवाह आणि घटस्फोटासोबत तुटणाऱ्या नात्यांची, बदलत्या विश्वासाची, त्याचे भयावह झटके यांसोबतच भारत, युरोप आणि हॉलीवुडमधील रोमांचक दिवस याची कहाणी आहे. ही एका माणसाच्या घडण्याची, तुटण्याची आणि पुन्हा जुळण्याची कहाणी आहे.कबीर बेदी, जे आपल्या आत्मचारित्रातून पहिल्यांदाच लेखक म्हणून समोर येत आहेत, ते एक आंतरराष्ट्रीय स्टार आणि मैत्रीण प्रियंकासोबत आपल्या पुस्तकाचे अनावरण करण्याबाबत अतिशय रोमांचित आहेत. नुकतेच प्रियंकाने देखील आपले आत्मचरित्र 'अनफिनिश्ड'च्या रूपाने लेखक म्हणून पदार्पण केले आहे. दिग्गज अभिनेता कबीर बेदी यांचे आगामी आत्मचारित्र, 'स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर' चे अनावरण आयकॉनिक प्रियंका चोप्रा जोनासद्वारे करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित हिंदीतील दोन दिग्गज व्यक्तिमत्व, जे आपल्या जीवन कहाणीसोबत लेखक बनले आहेत. ते आता कबीर यांच्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचे अनावरण करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्यांना एकाच मंचावर अनुभवणे, ही मोठी पर्वणी ठरणार आहे. कबीरच्या पुस्तकासाठी प्रियंका लंडनहून आभासी पद्धतीने जोडली जाणार असून त्याचा प्रीमियर एका मनोरंजन पोर्टल आणि कबीरच्या सोशल मीडियावर १९ एप्रिलला संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे.कबीर बेदी यांचे "स्टोरीज़ आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर" हे आत्मचरित्र १९ एप्रिल २०२१ ला भारतातील ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकस्टोर्समध्ये प्रकाशित होणार आहे.