मुंबई- अभिनेत्री-निर्माती प्रियंका चोप्रा जोनास हॉलिवूडमध्ये स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी व्यग्र झाली आहे. मात्र बॉलिवूडमध्ये तिने सक्रिय रहावे असे भारतातील चाहत्यांना मनापासून वाटते. याबद्दल तिला 'आस्क पीसीजे' या कार्यक्रमात विचारले असता प्रियंकाने खूपच उत्सफुर्त उत्तर दिले आहे.
२६ मार्च रोजी प्रियंकाने चाहत्यांसाठी आपला वेळ दिला. 'आस्क पीसीजे' या कार्यक्रमात तिच्यावर ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांनी प्रश्नांचा वर्षाव केला. यात एक प्रश्न तिला सतत विचारण्यात येत होता तो म्हणजे ती बॉलिवूडच्या आगामी कोणत्या चित्रपटात काम करीत आहे.
आचल राज सिंग या नावाच्या फॅनने प्रियंकाला विचारले की, ''तुझा पुढील बॉलिवूड चित्रपट कोणता आहे?'' याला उत्तर देताना प्रियंका म्हणाली, ''पुढील वर्षी!!!''
तिच्या आगामी बॉलिवूड चित्रपटाबद्दल खुलासा झाल्यामुळे भारतीय चाहत्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी तिला ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल त्यामुळे ती आनंदित झाली.
यापूर्वीच्या मुलाखतीत प्रियंकाने सांगितले होते की, तिला हिंदी आणि पश्चिमात्य अशा दोन्ही चित्रपटात काम करायचे आहे. मी पुढील वर्षी हिंदी सिनेमा करु शकेन. मी त्याच्यासाठी खूप उत्साहित आहे. मी त्यासाठी माझ्या काही मित्रांसोबत वेळापत्रकावर काम करीत आहे...पण निर्माती म्हणून भारतात माझ्यासाठी भरपूर काम आहे. यात मी कदाचित भूमिका करणार नाही परंतु चांगला आशय पोहोचवण्यासाठी जरुर प्रयत्न करणार आहे.
प्रियांका अलीकडेच ‘द व्हाईट टायगर’ या डिजिटल चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाची ती कार्यकारी-निर्मिती देखील होती. दिग्दर्शक रामिन बहरानी यांनी बनवलेल्या या चित्रपटात आदर्श गौरव, राजकुमार राव आणि महेश मांजरेकर यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा - 'तू म्हणशील तसं'चा हैदराबादमध्ये प्रयोग, रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कॅप्टन लेलेंचे आवाहन