नवी दिल्ली - अभिनेत्री प्रियांका चोप्राने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्या निर्भय महिलांनी अतुलनीय कामगिरी केली त्यांचे स्मरण करीत त्यांना आदरांजली वाहिली आहे.
आज आपला देश ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे. यानिमित्ताने प्रियंकाने स्वातंत्र्याच्या लढाईत आणि आपल्या देशाच्या निर्मितीत आपल्या योगदानाने इतिहास घडविलेल्या अनेक योद्धा महिलांचे महत्त्व अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टील फोटोंसह एक मोंटाज व्हिडिओ शेअर केलाय. यात स्वातंत्र्य लढ्यात अग्रस्थानी असलेल्या अमृत कौर, अरुणा असफ अली, कॅप्टन लक्ष्मी सहगल, दुर्गावती देवी, कमला नेहरू, कनकलाता बरुआ, कस्तूरबा गांधी, कित्तूर राणी चेन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी आणि उदा देवी या रणरागिणींचा व्हिडिओ शेअर केला आहे.
"वंदे मातरम्, त्या राणी होत्या, त्या सैनिक होत्या, त्या क्रांतिकारक होत्या, त्या संदेशवाहक, समर्थक आणि अर्थातच बऱ्याचजणी नेतृत्व करीत होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात असंख्य बलवान आणि निडर महिलांना जन्म मिळाला. प्रत्येकजणीने संघर्षात एक अनन्य भूमिका बजावली आहे आणि त्यातील प्रत्येकजणी आपल्या अंत: करणात आणि आपल्या इतिहासामध्ये कायमचा टिकून राहतील," असे चोप्राने व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर सांगितले.
यापूर्वी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांपैकी, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल, अमिताभ बच्चन, अनुपम खेर ते दिग्गज गायक लता मंगेशकर ते संगीतकार ए.आर. रहमान आणि इतरांनी 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.