महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तुम्ही फक्त कथ्थकच नाही तर खूप काही शिकवलं, वीरु कृष्णनन यांच्या निधनानं प्रियांका हळहळली - प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्राने कथ्थक गुरुंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.आम्ही सर्वांनी तुमच्याकडून केवळ नृत्यच नाही, तर इतरही अनेक गोष्टी शिकल्या, तुम्ही नेहमीच स्मरणात राहाल, असं प्रियांकानं म्हटलं आहे.

वीरु कृष्णनन यांच्या निधनानं प्रियांका हळहळली

By

Published : Sep 8, 2019, 5:47 PM IST

मुंबई- अभिनेता आणि कथ्थक गुरु वीरु कृष्णनन यांचे ७ सप्टेंबरला निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एक उत्तम व्यक्तीमत्त्व हरपले असल्याचे म्हणत पोस्ट शेअर केल्या आहेत.

हेही वाचा - तापसीचा 'थप्पड' सिनेमा भारतीय महिलांना समर्पित, शेअर केली पोस्ट

अभिनेत्री प्रियांका चोप्राने कथ्थक गुरुंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जेव्हा मला काहीही येत नव्हतं, तेव्हा तुम्ही मला डान्स करायला शिकवलात. तुमच्यातील धैर्य आणि नृत्याबद्दलची आवड इतकी होती, की आम्ही सर्वांनी तुमच्याकडून केवळ नृत्यच नाही, तर इतरही अनेक गोष्टी शिकल्या, तुम्ही नेहमीच स्मरणात राहाल, असं प्रियांकानं म्हटलं आहे.

वीरु हे सुप्रसिद्ध कथ्थक गुरु होते. कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, अथिया शेट्टी यांसारख्या अभिनेत्रींना त्यांनी नृत्य शिकवले आहे. कथ्थकशिवाय वीरु कृष्णनन यांनी काही चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत. यात 'राजा हिंदुस्तानी', 'इश्क' आणि 'अकेले हम अकेले तुम'सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा - चित्रपट हिट होवो अथवा फ्लॉप, चाहते नेहमीच माझ्यावर प्रेम करतात - भाईजान

ABOUT THE AUTHOR

...view details