मुंबई - बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या लूक्स आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. फॅशन आयकॉन म्हणूनही ती ओळखली जाते. सध्या ती लंडनमध्ये स्थिरावली आहे. अलिकडे तिच्या काही फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाचा देसी अंदाज पाहायला मिळत आहे.
प्रियांकाच्या स्टाईलिश लूकची तर नेहमीच चर्चा होत असते. मात्र, यावेळी चर्चा होतेय ती तिच्या मंगळसुत्राची. अलिकडेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय स्टाईलिश लूकमध्ये दिसतेय. विशेष म्हणजे तिने देसी परंपरा जपत मंगळसुत्रही घातले आहे. तिच्या या मंगळसुत्राची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते आहे.