मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने नवीन वर्षाच्या निमित्ताने चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने २०१९ या वर्षात तिच्या आयुष्यातील काही संस्मरणीय घटनांना स्थान दिलंय.
मॅडम तुसाद म्यूझियममधील तिच्या पुतळ्यापासून ते 'द स्काई इज पिंक' या चित्रपटातील घटनांचा या व्हिडिओत समावेश आहे. यात तिने खासगी आयुष्यातील काही घटनांचाही समावेश केलाय. यात तिचा पती निक जोनासही दिसून येतो.
प्रियंकाने व्हडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ''एका वर्षाची आणखी एक भेट. २०२० च्या पेटाऱ्यामध्ये काय दडलंय याची प्रतीक्षा करु शकत नाही. ईश्वर आणि इतर सर्वांचे आभार, ज्यांनी माझ्या आयुष्यात आनंद आणला.''