मुंबई- प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द स्काय इज पिंक’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिनं लिहिलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित आहे. आता सिनेमातील प्रियांका आणि फरहानचे काही खास फोटो समोर आले आहेत.
फरहान-प्रियांकाची रोमँट्रीक केमिस्ट्री; पाहा, द स्काय इज पिंकमधील फोटो - सोनाली बोस
फरहानने प्रियांकासोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे, द स्काय इज पिंक सिनेमा अथक परिश्रमांशिवाय खूप साऱ्या प्रेमासोबतही बनवला गेला आहे. हा सिनेमा टोरान्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये खूप सारं प्रेम आणि कौतुकाची थाप मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे
फरहानने प्रियांकासोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे, द स्काय इज पिंक सिनेमा अथक परिश्रमांशिवाय खूप साऱ्या प्रेमासोबतही बनवला गेला आहे. हा सिनेमा टोरान्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये खूप सारं प्रेम आणि कौतुकाची थाप मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचंही फरहाननं म्हटलं आहे.
तर प्रियांकानेही फरहानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली, प्रेम आणि खूप साऱ्या गोष्टींनी तयार झालेला सिनेमा. १३ सप्टेंबरला 'द स्काय ईझ पिंक' हा चित्रपट 'टोरान्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' मध्ये दाखवण्यात येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होत आहे.