मुंबई- अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अलीकडेच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ-छोटे मियाँ' या चित्रपटाची घोषणा झाली आणि त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता अक्षयच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे, कारण अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे.
यशराज फिल्म्सने चित्रपटाचे चार भव्य मोशन पोस्टर जारी करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'पृथ्वीराज'मधून सोनू सूद, संजय दत्त, मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार यांचे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये या स्टार्सचे फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले आहेत.
'पृथ्वीराज' 10 जून 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारनेही हे चारही मोशन पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. कोरोना विषाणूमुळे चित्रपटगृहे बंद पडल्यामुळे या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.