मुंबई- देशभरात कोरोनाची प्रकरणे वाढत असून बॉलीवूड देखील ( Corona in Bollywood ) यापासून दूर राहिलेले नाही. बॉलिवूड अभिनेता प्रेम चोप्रा ( Prem Chopra ) आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा ( Uma Chopra ) यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात ( Leelavati Hospital, Mumbai ) दाखल करण्यात आले आहे. डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता प्रेम चोप्रा आणि त्याच्या पत्नीला मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल देण्यात आले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेता प्रेम चोप्रा उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीला एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोघांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. प्रेम चोप्रा 86 वर्षांचे आहेत. चोप्रा यांच्या तब्येतीत होणारी सुधारणा लक्षात घेता त्यांना पुढील एक-दोन दिवसांतच डिस्चार्ज मिळेल, असे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर डॉ. जलील पारकर उपचार करत आहेत.
जॉन अब्राहमला पत्नीसह कोरोनाची बाधा