मुंबई- बॉलिवूड नवाब सैफ अली खानवर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहत्यांशिवाय कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यात बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटाचाही समावेश आहे.
माझ्या चेहऱ्यावर हसू खुलवणारा सहकलाकार, प्रीतीनं सैफसाठी शेअर केली पोस्ट - सलाम नमस्ते
प्रीतीनं दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं, माझा सर्वात उत्तम मित्र सैफ अली खान आणि सहकलाकार, जो नेहमी माझ्या चेहऱ्यावर हास्य खुलवतो आणि कधीही माझ्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही. अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यात माझा साथीदार.

प्रीतीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सैफसोबतचे फोटो शेअर केले आहेत. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय सैफ, माझा सर्वात उत्तम मित्र आणि सहकलाकार, जो नेहमी माझ्या चेहऱ्यावर हास्य खुलवतो आणि कधीही माझ्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही. अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यात माझा साथीदार.
पुढे प्रीतीनं लिहिलं, खरं तर आम्ही खूप कमी वेळा एकमेकांना भेटतो. तरीही आमची मैत्री तितकीच घट्ट राहते, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. तुला भविष्यातही असंच यश आणि आनंद मिळो, इतकीच प्रार्थना अन् खूप सारं प्रेम.... प्रीतीची ही पोस्ट दोघांच्या खास मैत्रीबद्दल सगळं काही सांगून जाणारी आहे. दरम्यान या जोडीनं 'कल हो ना हो', 'सलाम नमस्ते' आणि 'क्या कहना'सारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.