मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रस्थानम सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाची आतापर्यंत प्रदर्शित झालेली पोस्टर आणि टीझर पाहता संजय यात राजकीय अवताराता झळकणार असल्याचे लक्षात येत असल्याने चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सत्तेसाठी नात्यांचा गळा गोठणाऱ्या राजकारणाची कथा, 'प्रस्थानम'चा ट्रेलर प्रदर्शित - राजकीय थ्रिलर
या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सत्तेसाठी राजकारणात उतरलेल्या एकाच कुटुंबातील लोकांमध्ये येणारे दुरावे आणि यासाठी एकमेकांचा जीव घेणाऱ्या नात्यांची झलक पाहायला मिळत आहे.
अशात आता या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सत्तेसाठी राजकारणात उतरलेल्या एकाच कुटुंबातील लोकांमध्ये येणारे दुरावे आणि यासाठी एकमेकांचा जीव घेणाऱ्या नात्यांची झलक पाहायला मिळत आहे. हा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.
हा चित्रपट प्रस्थानम नावाच्याच तामिळ राजकीय थ्रिलर चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. सिनेमाची निर्मिती संजयची पत्नी मान्यता दत्त करणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन देवा कट्टा यांनी केलं असून येत्या २० सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.