महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

महिला दिनानिमित्त प्रार्थना बेहरेचा हटके लुक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

प्रार्थनाने जिन्सवर पिवळ्या रंगाच्या साडीत डेनीम जॅकेट घालून हटके फोटोशूट केले आहे.

Prarthna Behare latest photoshoot, Prarthna Behare wish womans day, Prarthana behare glamorous look, Prarthana Behare post, पार्थना बेहरचा हटके लुक, Prarthna Behare news
महिला दिनानिमित्त पार्थना बेहरचा हटके लुक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By

Published : Mar 8, 2020, 3:50 PM IST

मुंबई -आपल्या गोड हास्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या फॅशन सेन्सनेही तिने अनेकांवर भूरळ पाडली आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त तिने हटके लुकमध्ये फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रार्थनाने जिन्सवर पिवळ्या रंगाच्या साडीत डेनीम जॅकेट घालून हटके फोटोशूट केले आहे. कपाळावर ठसठशीत लाल रंगाच्या टिकलीने तिला आणखी आकर्षक केले आहे. तिचा हा लुक पारंपारिक आणि मॉडर्न स्त्रियांचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. या फोटोवर तिने खास कॅप्शनही दिले आहे. 'आज थोडा लिबास मे बदलाव लाया, कल थोडा समाज में होगा... पहचान तो है ही मेरी, बस अब रवायत ए आगाज होगा...', या ओळींनी तिने या फोटोला पूर्ण केले आहे.

हेही वाचा -होळीच्या गाण्यावर थिरकणार जॅकलिन, 'बिग बॉस' फेम असीमसोबत दिसणार रोमॅन्टिक अंदाज

तर, दुसऱ्या काही फोटोंमध्ये प्रार्थनाने पारंपारिक ड्रेसमध्ये फोटो शेअर करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -आंतरराष्ट्रीय महिला दिवस : बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details