महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Prabhas Treats Big B : ''बच्चन झाले प्रसन्न''!! प्रभासने बिग बीसाठी आणले स्वादिष्ठ घरगुती जेवण - अमिताभ प्रभास एकत्र

अमिताभ बच्चन आणि प्रभास नाग अश्विनच्या आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. प्रभासने अमिताभसाठी स्वादिष्ठ घरगुती जेवण आणले आणि वाढले. प्रभासच्या या कृतीचे अमिताभ यांनी ट्विटरवर खूप कौतुक केले आहे.

अमिताभ बच्चन आणि प्रभास
अमिताभ बच्चन आणि प्रभास

By

Published : Feb 21, 2022, 12:00 PM IST

Updated : Feb 21, 2022, 1:44 PM IST

मुंबई - 'बाहुबली' फेम प्रभास सध्या मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. प्रभासने अमिताभसाठी स्वादिष्ठ घरगुती जेवण आणले आणि वाढले. प्रभासच्या या कृतीचे अमिताभ यांनी ट्विटरवर खूप कौतुक केले आहे.

सोमवारी आपल्या ट्विटरवर अमिताभ बच्चन यांनी लिहिले, "'बाहुबली' प्रभास.. तुझी औदार्यता मोजण्यापलीकडची आहे. तू माझ्यासाठी घरी सर्वात स्वादिष्ट घरी शिजवलेले जेवण आणलेस. स्पेशल कुकीज ..चकचकीतच्याही पलीकडचे."

प्रभासच्या या आदरातिथ्यामुळे अमिताभ त्याच्यावर प्रसन्न झाला आहे. प्रभासने ज्यांच्यासोबत काम केले आहे त्यातील अनेकांना हा अनुभव आलेला आहे. तो दाक्षिणात्य पध्दतीचे घरगुती जेवण सहकलाकारांसोबत एन्जॉय करीत असतो.

प्रभास आणि अमिताभ बच्चन' के' या आगामी चित्रपटसाटी एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक 'प्रोजेक्ट के' असे आहे. 'महानटी' फेम नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत. या हेवी-बजेट चित्रपटाच्या शूटिंगची प्रक्रिया सुरू झाली आहेय

ह्ही वाचा -Dadasaheb Phalke Awards List : रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022

Last Updated : Feb 21, 2022, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details