मुंबई - अभिनेता प्रभास नव्या चित्रपटासाठी सज्ज झालाय. बाहुबली आणि साहो चित्रपटामुळे देशभर चाहते अलेल्या प्रभासने स्वतःच याची घोषणा केली. सोशल मीडियावर फर्स्ट लूक शेअर करीत चाहत्यांना त्याने खूश केले आहे.
'बाहुबली' फेम प्रभासच्या नव्या शूटींगला सुरुवात, पूजा हेगडेसोबत जोडी - Prabhas latest news
सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला सुरुलात झालीय. पूजा हेगडेसोबत त्याची ऑनस्रिन केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.
या फोटोत तो एका आलिशान पॅलेस किंवा म्यूझियममध्ये दिसत आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''हे सांगताना मला आनंद होतोय की मी नव्या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करीत आहे. चित्रपटाच्या मजेदार शेड्यूलकडे जात आहे.''
प्रभासचे चाहते या बातमीमुळे खूश झाले आहेत. दक्षिणेत त्याच्या चाहत्यांचे फॅन क्लब आहेत. सोशल मीडियावर ते आपला आनंद व्यक्त करीत आहेत. त्याच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण करीत आहेत. तेलुगुत बनत असलेला हा चित्रपट अनेक भाषांमधून रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात आहे.