महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एका ज्योतिषाने त्याच्या यशाचे केले होते भाकीत : प्रभासचा खुलासा

नुकत्याच रिलीज झालेल्या ''राधे श्याम'' या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास एका उत्कृष्ट हस्तरेखा ज्येतिषाची भूमिका साकारत आहे. त्याने खुलासा केला आहे की चित्रपट उद्योगातील त्याच्या यशाचा अंदाज एका हस्तरेषा पाहणाऱ्या ज्येतिषाने तो जन्मला तेव्हाच वर्तवला होता.

सुपरस्टार प्रभास
सुपरस्टार प्रभास

By

Published : Mar 11, 2022, 3:36 PM IST

मुंबई - सुपरस्टार प्रभास, जो त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ''राधे श्याम''मध्ये हस्तरेखा ज्येतिषाच्य भूमिकेत आहे, त्याने ज्योतिषावर आपला विश्वास आहे की नाही हे उघड केले आहे. स्वत: बद्दल कमी ज्ञात गोष्टी शेअर करताना, प्रभासने म्हटले आहे की चित्रपट उद्योगातील त्याच्या यशाचा अंदाज एका हस्तरेषाकाराने वर्तवला होता जेव्हा तो जन्माला आला होता.

राधा कृष्ण कुमार लिखित आणि दिग्दर्शित राधे श्याम एक पीरियड रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यातील नायक विक्रमादित्य एक भव्य हस्तरेखाकार आहे जो नियती आणि प्रेरणावरील प्रेम यांच्यासाठी संघर्ष करतो. अभिनेत्री पूजा हेगडेने यात प्रेरणा ही व्यक्तीरेखा साकारली आहे.

नवी दिल्लीत राधे श्यामच्या प्रमोशन दरम्यान, प्रभासला विचारण्यात आले की त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याचा हस्तरेषा आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे का? यावर अभिनेत्याने उत्तर दिले, "मी असे कधीच फॉलो केले नाही. आम्ही अनेक कथा ऐकल्या आहेत... माझ्या कुटुंबातही आम्ही अनेक कथा ऐकल्या होत्या... . मी जन्माला आलो तेव्हा हा मोठा होणार असे एका ज्येतिषाने सांगितल्याचे माझे काका सांगायचे. पण मी कधीही हस्तरेषा किंवा ज्योतिषशास्त्राचे पालन केले नाही..."

आज भारतातील सर्वात मोठा पॅन इंडिया स्टार असलेला प्रभास पुढे म्हणाला की, " आपल्याकडे भारतात ज्योतिषशास्त्राची समृद्ध संस्कृती आहे पण मी कधीही त्याचे पालन केले नाही."

''बाहुबली'' चित्रपटामुळे प्रभास संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाला आणि तेव्हापासून त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. अभिनेत्याकडे अनेक मोठ्या-बजेटचे चित्रपट आहेत ज्यात अनेक संपूर्ण भारतातील चित्रपटांचा समावेश आहे. त्याच्या आगामी चित्रपटांच्या स्लेटमध्ये साय-फाय ''प्रोजेक्ट के'', पौराणिक चित्रपट ''आदिपुरुष'' आणि अॅक्शन थ्रिलर ''सालार'' या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा -प्रीमियर लीग फुटबॉलसाठी रणवीर सिंग यूकेला रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details