मुंबई (महाराष्ट्र)- बहुप्रतीक्षित प्रभास-पूजा हेगडे यांची भूमिका असलेला राधे श्याम चित्रपट अखेर 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी हा बहुभाषिक चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. परंतु देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे तो पुढे ढकलला गेला होता.
बुधवारी चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह नवीन रिलीजची तारीख शेअर केली. "चमकदार प्रेमकथेची नवीन रिलीज डेट आहे! #राधेश्याम 11 मार्च रोजी सिनेमागृहात," असे ट्विटमध्ये लिहिले आहे.