हैदराबाद - अभिनेता प्रभासचा 'साहो' हा चित्रपट ३० ऑगस्टला रिलीज होतोय. तेलंगणा आणि आंध्रमध्ये प्रभासचे डायहार्ट फॅन आहेत. दक्षिणेतील राज्यात जेव्हा चित्रपट रिलीज होतो, तेव्हा अभिनेत्यांचे चाहते थिएटर्स सजवतात, उंच कटआऊट लावतात, बॅनरबाजी होते. साहोचे पोस्टर लावण्याचे काम मेहबूबनगर येथील तिरुमाला थिएटरमध्ये सुरू होते. त्यावेळी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
थिएटरवर पोस्टर लावण्याचे काम सुरू होते. प्रभासचा एक फॅन यासाठी थिएटरच्या भिंतीवर चढला असताना त्याचा संपर्क इलेक्ट्रीक तारांशी आला. त्याला जोरदार झटका बसला आणि तो वरुन खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला झाला आहे.