हैदराबाद - अनेक मोठ्या आणि छोट्या बजेट चित्रपटांपैकी आदिपुरुष हा एक चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर हलविण्यात येणार आहे. निर्मितीच्या स्थानात बदल झाल्यामुळे निर्मात्यांना याचा भार सोसावा लागणार आहे.
मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे महाराष्ट्र सरकारने सर्व शूटिंग रद्द केली आहेत. आदिपुरुषच्या निर्मात्यांनी मुंबई फिल्म सिटीमध्ये भव्य सेट उभा केला आहे. असाच सेट हैदराबादमध्ये उभा करण्यासाठी निर्मात्यांना आणखी खर्च करावा लागेल. तथापि या चित्रपटाचे काही शूटिंग हैदराबादमध्ये झाले आहे. जास्त खर्च न करताही हैदराबादमध्ये शूटिंग होऊ शकते असा सल्ला प्रभासनेही दिला आहे.