महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'साहो' मध्ये श्रद्धाच नाही, तर जॅकलिनसोबतही प्रभासचा रोमान्स, पाहा व्हिडिओ - प्रभास

आता जॅकलिनसोबतही प्रभास रोमान्स करताना दिसणार असल्यामुळे चाहत्यांना या गाण्याची प्रतीक्षा आहे. 'बॅड बॉय', असे या गाण्याचे बोल आहेत.

'साहो' मध्ये श्रद्धाच नाही, तर जॅकलिनसोबतही प्रभासचा रोमान्स, पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 19, 2019, 12:02 PM IST

Updated : Aug 19, 2019, 12:11 PM IST

मुंबई - अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या 'साहो' चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १५ ऑगस्ट रोजीच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून ३० ऑगस्ट करण्यात आली. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. अलिकडेच या चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्येच प्रभास आणि जॅकलिनची केमेस्ट्री असलेले गाणे देखील प्रदर्शित करण्यात आले.

प्रभास आणि श्रद्धाची केमेस्ट्री असलेले 'इन्नी सोनी' हे गाणे तर यापूर्वीच प्रेक्षकांनी पाहिले. या गाण्यासह चित्रपटाच्या टीजर, ट्रेलर आणि पोस्टरमध्येही दोघांची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळाली. आता जॅकलिनसोबतही प्रभास रोमान्स करताना दिसणार असल्यामुळे चाहत्यांना या गाण्याची प्रतीक्षा आहे. 'बॅड बॉय', असे या गाण्याचे बोल आहेत.

रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद येथे हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटमध्ये लाखो चाहत्यांनी हजेरी लावली होती. प्रभासने यावेळी चाहत्यांचे आभारही व्यक्त केले.

हा चित्रपट हिंदीसह, तेलुगू आणि तमिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या सर्वच भाषेतील कलाकारांची टीम यावेळी उपस्थित होती.

Last Updated : Aug 19, 2019, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details