मुंबई- मालदीवला जाणाऱ्या विमानामध्ये मोठे आकर्षण होते ते बॉलिवूडचे सर्वात मोठे सेलिब्रिटी लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे. सोमवारी सुट्टीवर जाण्यापूर्वी ते विमानतळावर हौशी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले.
गेल्या आठवड्याभरात कोविड -१९ शी झुंज देत आलियाची १४ एप्रिल रोजी टेस्ट निगेटिव्ह आली. रणबीरलाही गेल्या महिन्याच्या शेवटी कोरोनाची बाधा झाली होती. तो आता या आजारातून पूर्ण बरा झाला आहे. दोघेही कोरोना मुक्त झाल्यानंतर सुट्टीसाठी रवाना झाले आहेत.
सोमवारी सकाळी हे जोडपे मुंबई विमानतळावर लॉकडाऊन दरम्यान मालदीवला जात असताना दिसून आले. कोरोना व्हायरस साथीची दुरी लाट देशात आली असताना अनेक सेलेब्रिटी मालदिवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.