मुंबई- अभिनेता इरफान खाननं कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी काही काळ बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. या उपचारानंतर आता इरफान पुन्हा एकदा कामावर परतला असून त्याने 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच 'अंग्रेजी मीडियम'च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूर्वी जैन इरफानच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.
'अंग्रेजी मीडियम' अभिनेत्री पूर्वी जैन म्हणते, करिना या चित्रपटात आहे हे मला गुगलनं सांगितलं - google
'अंग्रेजी मीडियम'साठी मी ऑडिशन दिली आणि माझी निवड करण्यात आली. मात्र, मी सेटवर माझा पहिला सीन शूट करण्यासाठी गेले तोपर्यंत मला हे माहिती नव्हतं, की मला इरफानच्या पत्नीची भूमिका साकारायची आहे, असं पूर्वीनं म्हटलं आहे.
या सिनेमात करिना कपूरही झळकणार असल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलं आहे. यावर आता पूर्वी जैननं प्रतिक्रिया दिली आहे. मला सुरूवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. मात्र, पहिल्याच चित्रपटात मला इरफानसोबत काम करण्याची संधी मिळेल, असं वाटलं नसल्याचं तिनं म्हटलं आहे. यासोबतच 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटासाठी मी ऑडिशन दिली आणि माझी निवड करण्यात आली. मात्र, मी सेटवर माझा पहिला सीन शूट करण्यासाठी गेले तोपर्यंत मला हे माहिती नव्हतं, की मला इरफानच्या पत्नीची भूमिका साकारायची आहे.
इतकंच नव्हे तर चित्रपटात करिना कपूर खानदेखील झळकणार आहे, याबद्दलही मला काहीही कल्पना नव्हती असंही तिनं म्हटलं आहे. जेव्हा माझ्या पहिल्या चित्रपटाची स्टारकास्ट पाहण्यासाठी मी गुगलवर सर्च केलं, तेव्हा यात करिना कपूरचाही रोल असल्याचं आपल्याला समजल्याचं तिनं म्हटलं आहे. दरम्यान 'अंग्रेजी मीडियम' चित्रपट २५ एप्रिल २०२० ला चित्रपटगृहे गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.