मुंबई -अभिनेत्री पूनम पांडे ही आगामी रिअॅलिटी शो लॉक अप मध्ये प्रवेश करणारी नवीन स्पर्धक आहे. शोमध्ये पूनम सहभागी होत असल्याचे निर्मात्यांनी एका प्रोमोतून सांगितले आहे.
27 फेब्रुवारीपासून ALTBalaji आणि MX Player वर प्रसारित होणार्या या शोसाठी पूनम तिसरी स्पर्धक असल्याचे निश्चित झाले. पूनम पांडेला लॉक करण्याआधी निर्मात्यांनी यापूर्वी स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि अभिनेता निशा रावल यांच्या सहभागाची पुष्टी केली होती. प्रोमोमध्ये पूनमला 'हॉट अँड एक्स्ट्रीमली बॉदर्ड' या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे दिसत आहे.
पूनम तिच्या धाडसी विधानांसाठी आणि अगदी बिनधास्त वागण्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरील तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुले मनोरंजन जगतातील ती सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी हा अभिनेत्री मानली जाते.