पणजी- अभिनेत्री पूनम पांडेने पुन्हा एकदा गोव्यात खळबळ उडवली आहे. ती आणि तिचा पती सॅम बॉम्बे याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. काणकोन येथील चपोली धरणावर पूनम आणि तिचा नवरा सॅम हे अश्लील व्हिडिओ शूट करीत होते. गोवा सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मालमत्तेमध्ये पूनम पांडे हिने 'अश्लील' फोटोशूट केल्याचा आरोप स्थानिक विरोधी पक्ष गोवा फॉरवर्ड यांनी केला होता.
विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक पोलीस व धरणावरील कर्मचारीही सहभागी होते. पूनम अश्लील हाव भाव करीत असताना त्याचे शूटिंग सॅम करीत होता. त्यांना संरक्षण पोलीस कर्मचाऱ्यांनी दिले होते. यामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.