मुंबई- ज्येष्ठ चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या निधनाची बातमी पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने महेश यांचे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात आता पूजा भट्टने या प्रकरणावर प्रतिक्रिया देत हे वृत्त फेटाळले आहे.
महेश भट्ट यांच्या निधनाच्या वृत्तावर पूजा भट्टनं दिली 'अशी' प्रतिक्रिया - आदित्य रॉय कपूर
पूजाने सोशल मीडियावरुन महेश भट्ट यांचे काही फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन देत ती म्हणाली, अफवा पसरवणारे आणि माझ्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून काळजी करत असणाऱ्यांसाठी हा फोटो पुरावा आहे.
महेश भट्ट
पूजाने सोशल मीडियावरुन महेश भट्ट यांचे काही फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन देत ती म्हणाली, अफवा पसरवणारे आणि माझ्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून काळजी करत असणाऱ्यांसाठी हा फोटो पुरावा आहे, की माझे वडील अगदी ठीक आहेत.
चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, महेश भट्ट सध्या 'सडक २'च्या दिग्दर्शनात व्यग्र आहेत. या सिनेमात आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका असणार असून या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडिलांसोबत काम करताना दिसणार आहे.