महाराष्ट्र

maharashtra

अलाया बेदीनं पूर्ण केलं 'जवानी जानेमन'चं चित्रीकरण, शेअर केली पोस्ट

अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया बेदी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकत असून नुकतंच तिनं आपल्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. 'जवानी जानेमन' असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटात ती सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

By

Published : Aug 7, 2019, 8:51 PM IST

Published : Aug 7, 2019, 8:51 PM IST

अलाया बेदीनं पूर्ण केलं 'जवानी जानेमन'चं चित्रीकरण

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. यातील बहुतेकांना प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश मिळालं. यानंतर आता अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया बेदीदेखील बॉलिवूडमध्ये पाऊल टाकत असून नुकतंच तिनं आपल्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.

'जवानी जानेमन' असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटात ती सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अलायानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं असल्याची माहिती दिली आहे. सध्या खूप खूष आहे. जवानी जानेमन चित्रपटाचं माझं शेड्यूल पूर्ण. यापेक्षा जास्त मला काहीच नको, खूप खूप धन्यवाद...असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान या चित्रपटात सैफ अलायाच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात तब्बूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नितिन कक्कड या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details