मुंबई- अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची बुधवारी क्रूज ड्रग प्रकरणात जामीन मिळावा यासाठी सुनावणी होणार आहे. आर्यन खानच्या अटकेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. शाहरुख खानचे चाहते त्याच्या घरासमोर पोस्टर लावून आणि सोशल मीडियावर त्याच्यासाठी पोस्ट लिहून त्याला पाठिंबा दर्शवत आहेत.
दरम्यान, अखिल कात्याल यांची एक कविता खूप व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने शाहरुख खानबद्दल आपले मत मांडले आहे. ही कविता बॉलिवूड दिग्दर्शक नीरज घायवान यांनी रिट्विट केली आहे आणि स्वतः काही ओळी लिहिल्या आहेत. या कवितेची स्वरा भास्करनेही स्तुती केली आहे.
अखिल कात्याल यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या कवितेच्या ओळी अशा आहेत...
'वो कभी राहुल है, कभी राजक भी है
कभी चार्ली तो कभी मॅक्स
सुरिंदर भी वो, हॅरी भी वो
देवदास भी और वीर भी
राम, मोहन, कबीर भी
वो अमर है, समर है
रिजवान, रईस, जहांगीर भी
शायद इसलिए कुछ लोगों के हलक में फंसता है की एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है.
स्वरा भास्करने शाहरुख खानला टॅग करून या कवितेसह हृदयाची इमोजी पोस्ट केली आहे.