मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनपट उलगडणारा 'पीएम नरेंद्र मोदी' हा बायोपिक बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच या बायोपिकबाबत वाद निर्माण झाले आहेत. मात्र, हा बायोपिक प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या बायोपिकमधील 'सौंगध मुझे इस मिट्टी की' हे पहिलं वहिलं गाणं रिलीज झाले आहे.
'सौगंध मुझे इस मिट्टी की' या गाण्यातून शहिदांसाठी अभिवादन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या अलिकडील भाषणांच्या संदर्भावरुन हे गाणे तयार करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पुलवामा हल्ल्यातील विरमरण आलेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे त्यांनी एका भाषणादरम्यान म्हटले होते. हेच बोल या गाण्यात ऐकायला मिळतात. अभिनेता विवेक ओबेरॉयचा मोदींच्या भूमिकेतील दमदार अभिनयही या गाण्यात पाहायला मिळतो.