मुंबई -बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करून कोरोनाविषयी जनजागृती केली होती. या व्हिडिओत त्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना गर्दीत न जाण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्याने आपल्या 'प्यार का पंचनामा' चित्रपटातील हटके स्टाईल वापरली होती. त्याच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कार्तिकचा हा व्हिडिओ पोस्ट करून 'कोरोनाचा पंचनामा' करूया, असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे, की 'ही वेळ 'ज्यादा सावधान' राहण्याची आहे'. तसेच, 'सर्व मिळून कोरोनाचा पंचनामा करूयात', असे कॅप्शन देऊन त्यांनी कार्तिकचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हेही वाचा -कोरोना व्हायरसवर नंदेश उमप यांचा हा पोवाडा एकदा ऐकाच!