महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह! - कुमार सानू फेसबुक

"दुर्दैवाने सानूदा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा" अशा आशयाची पोस्ट सानू यांच्या फेसबुक पेजवरून करण्यात आली होती. यानंतर सानू यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या कित्येक चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला...

Playback singer Kumar Sanu tests COVID-19 positive
प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह!

By

Published : Oct 16, 2020, 10:55 AM IST

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सानू यांच्या सोशल मीडिया टीमने फेसबुकवरुन याबाबत माहिती दिली.

"दुर्दैवाने सानूदा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा" अशा आशयाची पोस्ट सानू यांच्या फेसबुक पेजवरून करण्यात आली होती. यानंतर सानू यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या कित्येक चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला.

दरम्यान, सानू यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, की घरातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

हेही वाचा :शनिवारपासून शबरीमला मंदिर भाविकांसाठी होणार खुले

ABOUT THE AUTHOR

...view details