'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला मोदींची भूमिका करणारा विवेक ओबेरॉय त्याच अवतारात पत्रकार परिषदेला समोरा गेला. उमंग कुमार दिग्दर्शित या सिनेमात बरखा बिस्त, जरीना वहाब, मनोज जोशी, दर्शन कुमार, किशोरी शहाणे वीज यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचा ट्रेलर लाँच, मोदींची जीवनकथा 5 एप्रिलला येणार मोठ्या पडद्यावर - trailer launch
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' यांच्या बायोपिकचा ट्रेलर आज अखेर लाँच झाला. या सिनेमाद्वारे नरेंद्र मोदी यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर येणार आहे.
जानेवारी महिन्यात घोषणा झाल्यानंतर अवघ्या 38 दिवसात सिनेमा पूर्ण करून आज त्याचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये मोदींच्या वडनगर स्टेशनवर चहा विकण्यापासून ते आणीबाणीच्या काळातील संघर्ष आणि पुढे मुख्यमंत्री झाल्यावर गुजरातला प्रगतीपथावर नेण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. मोदींच्या आयुष्यातील गुजरात दंगल आणि अक्षरधाम मंदिरावरील हल्ला यासारखा विषयाना सिनेमातून स्पर्श करण्यात आला आहे.
या सिनेमाची रिलीज डेट 5 एप्रिल अशी ठेवण्यावरून वाद सुरू झाला असला तरीही सिनेमाच्या टीमने त्यावर स्पष्टपणे काहीही बोलणं टाळलं आहे. त्याशिवाय मोदी यांची प्रतिमा संवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच ट्रेलर पाहून दिसतंय. आता या सिनेमाचा लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होतो का ते मात्र सिनेमा पूर्ण पाहिल्याशिवाय सांगता येणे अवघड आहे.