मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी होती. आज यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यात चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व नियमांच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.
पुन्हा घुमणार रोल, कॅमेरा अँड अॅक्शनचा आवाज; चित्रपटांसह मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी - lockdown effect on film industry
चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व नियमांच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येतील. निर्मात्यांनी या नियमांप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करायचे आहे.

आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येतील. निर्मात्यांनी या नियमांप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करायचे आहे. नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील, असेही यात म्हटले आहे.
कोरोना संदर्भात लागू केलेल्या सूचना यासाठीही लागू राहतील. या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.